दिल्ली-एनसीआरसह बेंगळूरात समाधानकारक गुंतवणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय टेक स्टार्टअप्समध्ये 2019 मधील गुंतवणूक 18 टक्क्यांनी वाढून 14 अब्ज डॉलरच्या (जवळपास 99,400 कोटी रुपये) घरात पोहोचली आहे. या गुंतवणुकीमध्ये दिल्ली-एनसीआर आणि बेंगळूरात सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती रिसर्च आणि कन्सल्टिंग फर्म हेक्सजेनच्या अहवालात देण्यात आली आहे.
भारतामधील स्टार्टअप्सचे व्यवहार आणि त्यामधून उपलब्ध झालेल्या फंडिंगची संख्या समाधानकारक राहिलेली आहे. यात प्रामुख्याने ओयो, पेटीएम, ओला इलेक्ट्रिक, उडान, बाउंस आणि डिलिव्हरीसारख्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. आशियामधील स्टर्टअप्सचे व्यवहार 27 टक्क्यांनी घसरले आहेत. तर भारतामधील ही घसरण 15 टक्क्यांवर राहिली आहे. तर या सर्वांच्या तुलनेत स्टार्टअपमधून मिळणारे फंडिंगमध्ये भारतात मात्र 18 टक्क्यांनी वाढ नेंदवली आहे. जागतिक पातळीवर ही घसरण 22 टक्के आणि आशियात 56 टक्क्यांची नोंदवली आहे.
फिनटेकमधून अधिकची कमाई
हेक्सजेनने जवळपास 60 हजार व्यवहार आणि 10 लाख डाटा प्वाइंट्सचा अभ्यास करुन हा अहवाल सादर केला आहे. यात दिल्ली-एनसीआर या ठिकाणाहून 7.4 अब्ज डॉलरचे फंडिंग मिळवले आहे. तर बेंगळूरमधील स्टार्टअपवर आधारीत फंडिंग 4.4 अब्ज डॉलर जमा केले आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात 2.2 अब्ज डॉलर उभा केला आहे. ट्रान्स्पोर्ट आणि पुरवठा क्षेत्रातून स्टार्टअपला 2.4 डॉलर आणि फायनाशिअल टेक्नालॉजी कंपन्यांना 4.1 अब्ज डॉलरची अर्थ प्राप्ती झाली आहे.