पुणे
पबजीच्या भारतीय व्हर्जनकरीता येत्या 18 मेपासून पूर्वनोंदणीला सुरूवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनी पबजी गेमने संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळवली होती. पण भारतात बंदी घातल्यानंतर भारतीय पबजी व्हर्जन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण कोरीयोतील पबजीचे निर्माते क्राफ्टनने भारतीयांसाठी पबजी गेमची निर्मिती केली आहे. याकरीता 18 मेपासून पूर्वनोंदणी करण्याची गरज असणार आहे. भारतात हा नवा भारतीय पबजी अवतार लाँच होणार असून गुगल प्ले स्टोरवर याकरीता नोंदणी करता येणार आहे.