वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये गेल्या बऱयाच वर्षांपासून विदेशी प्रशिक्षकावर अवंबून रहावे लागत असल्याने टीका केली जात आहे पण आता परिस्थिती बदलली असून भारतीय प्रशिक्षकांना अधिक संधी दिली जावी असे मत भारतीय फुटबॉल गोलरक्षक सुब्रता पाल यांनी व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय किंवा क्लब स्तरावर फुटबॉल संघांना व्यवस्थितपणे हाताळण्याची क्षमता संबंधीत भारतीय फुटबॉल प्रशिक्षकाकडे आहे किंवा नाही याची पडताळणी करणे आवश्यक आहे. योग्य भारतीय प्रशिक्षकाची निवड यापुढे करताना त्यांना आणखी एक संधी दिली जावी, असेही पाल यांनी म्हटले आहे. भारतातमध्ये राष्ट्रीय फुटबॉल लीगला प्रारंभ झाल्यानंतर प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी पदवीची अट घालण्यात आली नव्हती पण पदवीधर प्रशिक्षकच असावा, असा नियम करण्यात आला. त्यावेळी मात्र देशातील विविध फुटबॉल क्लबनी विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती सुरू केली. पदवीधर भारतीय प्रशिक्षक तुरळक असल्याने त्यांची उणीव भास्त होती पण आता ही परिस्थिती बदलली आहे. इंडियन सुपर लीग स्पर्धेतील एकाही संघाला आजपर्यंत एकाही भारतीय फुटबॉल प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लभलेले नाही. त्यामुळे आता प्रशिक्षकाची नियुक्ती करताना भारतीय फुटबॉल प्रशिक्षकांना आणखी एक संधी उपब्लध करून द्यावी, असे आवाहन पाल यांनी केले आहे.