ऑनलाईन टीम / बीजिंग :
भारतातून आयात केलेल्या फ्रोझन माशांच्या पाकिटांवर कोरोना विषाणू आढळल्याने चीनने बसू इंटरनॅशनल या भारतीय कंपनीवर एक आठवड्याची बंदी घातली आहे.
चिनी कस्टम विभागाच्या माहितीनुसार, भारतातून चीनमध्ये फ्रोझन मासे पाठवण्यात येतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इतर देशातून आयात होणाऱ्या मालाची कडक तपासणी करण्यात येते. भारतातून आलेल्या फ्रोझन माशांच्या तीन पाकिटांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाकिटांवर कोरोनाचे विषाणू आढळले. त्यानंतर भारतातून फ्रोझन मासे निर्यात करणाऱ्या बसू इंटरनॅशनलवर एक आठवड्याची बंदी घालण्यात आली.
एका आठवड्यानंतर ही कंपनी पुन्हा चीनला मासे निर्यात करू शकते, असेही चीनच्या कस्टम विभागाने स्पष्ट केले आहे.