सेन्सेक्स 533 तर निफ्टी 156 टक्क्यांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारामध्ये सलग चौथ्या दिवशी बुधवारी सेन्सेक्समधील तेजीच्या वातावरणामुळे उत्साहाची स्थिती राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 500 अंकांसोबत वधारत 61,000 चा टप्पा पुन्हा सलग दुसऱया सत्रात केल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 533.15 अंकांनी मजबूत होत 61,150.04 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 156.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,212.35 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील मजबूत कामगिरी करणाऱया कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टीलचे समभाग हे प्रामुख्याने 4.68 टक्क्यांनी नफा कमाईत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टीसीएस, टायटन, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, विप्रो आणि नेस्ले 1.50 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.
अभ्यासकांच्या नजरेतून
बाजारामधील तेजी ही प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान कंपन्या विप्रो, इन्फोसिस आणि आयटीसीच्या कामगिरीमुळे राहिली आहे. याच सकारात्मक गोष्टींचा परिणाम हा भारतीय भांडवली बाजारावर पडला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी स्पष्ट केले आहे. प्रमुख बँकांचे आर्थिक उलाढालीबाबतचे आकडे हे शनिवारपासून येण्यास सुरु होणार आहेत. यामध्ये विविध गोष्टींवर बदल होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
मुख्य क्षेत्रांची भरारी
कोरोना संदर्भातील आकडेवारी वाढत असतानाही रियल्टी, वाहन, ऊर्जा आणि बँक समभागांमधील निर्देशांकात तेजीचे वातावरण राहिले होते. तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखानी केलेल्या वक्तव्यामुळे काहीशी चिंता लांबणीवर पडली आहे. आशियातील बाजारात अधिकचा कल तेजीत राहिला आहे.