तिमाहीत 34 टक्के वाटा मिळवत अव्वल स्थानी
नवी दिल्ली
भारतीय बाजारात सॅमसंग टॅबला मागणी पुन्हा वाढली आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन(आयडीसी) यांच्या अहवालानुसार वर्षातील पहिल्या तिमाहीदरम्यान टॅब मार्केटमध्ये सॅमसंगने 34 टक्के बाजारातील हिस्सा मिळवत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. यादरम्यान कंपनीच्या टॅब एस6 लाइट, टॅब ए7, टॅब एस7 आणि टॅब एस7 मॉडेल याची सर्वाधिक विक्री झाली आहे.
टॅब मार्केटच्या स्पर्धेत लेनोव्हा दुसऱया आणि ऍपल तिसऱया स्थानी राहिले आहेत. पहिल्या तिमाहीदरम्यान लेनोव्हाचा मार्पेटमधील हिस्सा 30 टक्के आणि ऍपलचा 16 टक्के राहिल्याची नोंद आहे.
बिजनेस-टू-कंझ्युमर सेगमेंट
आयडीसीच्या माहितीनुसार सॅमसंगने भारतामध्ये 2021 च्या पहिल्या तिमाहीदरम्यान पहिले स्थान प्राप्त केले आहे. वर्षाच्या आधारे ही वाढ 15 टक्क्यांनी झाली आहे. देशातील बिजनेस-टू-कंझ्युमर सेगमेंटमध्ये सॅमसंगने 43 टक्के बाजारातील हिस्सा प्राप्त केला आहे.
कोरोना काळाचा लाभ
जगातील बऱयाचशा देशांमध्ये कोरोना महामारीचा कालावधी सुरू आहे. यामध्ये टॅब्लेट आणि क्रोमबुकच्या विक्रीत मोठी तेजी आली आहे. मागील महिन्यात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जागतिक पातळीवर 2021 च्या तिमाहीत टॅब विक्री वर्षाच्या आधारे 55.2 टक्क्यांसह एकूण 4 कोटी युनिटची झाली आहे.
जागतिक बाजारात दुसऱया स्थानी
कमी किमतीमध्ये अत्याधुनिक सुविधांयुक्त असणाऱया सॅमसंग टॅबला मागणी वाढत गेली असून यामध्ये शाळांनी अधिक पसंती दर्शवली आहे. जागतिक पातळीवरील 2021 च्या पहिल्या तिमाही दरम्यान सॅमसंगने टॅबच्या बाजारात 20 टक्के हिस्सा प्राप्त करत दुसऱया स्थानी झेप घेतली.