क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोव्याची बॅडमिंटनपटू तनिशा प्रास्टो हिची भारतीय बॅडमिंटन संघ निवडीसाठी चाचणीत निवड झाली आहे. अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघ येणाऱया प्रतिष्ठतेच्या थॉमस आणि उबेर कप तसेच सुदिरमन कप बॅडमिंटन स्पर्धेत आपले संघ पाठविणार असून यासाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. स्पर्धा यंदा डॅन्मार्क आणि फिनलँड येथे होणार असून यासाठी निवड चाचणी हैदराबाद येथील पुल्लेला गोपीचंद अकामीत 28 ऑगस्टपासून होणार आहे. सध्या तनिशा क्रास्टो मिश्र दुहेरीत ज्युनियर गटात चॅम्पियन आहे. टॉप्स ऑलिम्पिक स्कीममध्ये निवडण्यात आलेली तनिशा ही गोव्याची एकमेव क्रीडापटू आहे. तनिशाला चाचणीत मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरी या दोन्ही गटात स्थान मिळाले आहे.