आशियाई चॅम्पियनशिपमधील कामगिरीने आत्मविश्वास दुणावला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे 9 सदस्यीय बॉक्ंिसगचे पथक ऑलिम्पिकमध्ये आव्हान उभे करण्यापूर्वी विदेशात 3 आठवडय़ांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहे. अलीकडेच दुबईत संपन्न झालेल्या आशियाई बॉक्ंिसग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी धमाकेदार प्रदर्शन साकारले. त्यामुळे, त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.
बॉक्ंिसग संघाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सा†िन्तयागो निएव्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बॉक्सर्स प्रत्यक्ष ऑलिम्पिकपूर्वी 5 ते 7 दिवस आधी जपानला पोहोचतील. सध्याच्या रुपरेषेनुसार, यंदाचे ऑलिम्पिक दि. 23 जुलैपासून सुरु होत आहे. ‘आम्ही प्रशिक्षणासाठी विदेशी जात आहोत. साधारणपणे, 3 आठवडय़ांचे हे शिबिर असेल. सध्या याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच शिबिराचे ठिकाण निश्चित केले जाईल. तेथे 3 आठवडे सराव केल्यानंतर ऑलिम्पिकला 5 ते 7 दिवसांचा अवधी बाकी असताना पथक जपानमध्ये पोहोचेल’, असे निएव्हा यांनी यावेळी सांगितले.
भारतीय बॉक्ंिसग संघाने मागील काही महिन्यांपासून स्पर्धा व सरावासाठी सातत्याने प्रवास केला असून यात प्रदीर्घ युरोप दौऱयाचाही समावेश आहे. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे संघातील बॉक्सर्सना मायभूमीतच सराव सुरु ठेवता आलेला नाही. एप्रिलमध्ये तर संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक सी. ए. कुट्टप्पा यांनाही कोरोनाची बाधा झाली व यामुळे ते 10 दिवस क्वारन्टाईन होते.