वृत्तसंस्था/ ओस्लो (नॉर्वे
येथे सुरू असलेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्ल रविंदरने रविवारी 61 किलो वजनगटामध्ये कास्यपदकासाठीच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविले. रविंदरने सुरूवातीला झालेल्या पिछाडीनंतर बल्गेरियाचा मल्ल व्हँगेलोव्हचा पराभव केला.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय मल्ल रविंदर दाहियाने उपांत्य लढतीत बऱयाच गुणांनी पिछाडीवर राहिल्यानंतर प्रस्तिपर्धी मल्लावर शानदार विजय मिळविला होता. दाहियाप्रमाणेच रविंदरने ओस्लोतील विश्व कुस्ती स्पर्धेत असाच थरारक विजय नोंदवित प्ले ऑफ गटात स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारताच्या पंकज मलिक तसेच रोहित आणि पृथ्वीराज पाटील यांचे विविध गटातील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. आता रविंदरची कांस्यपदकासाठीची लढत अमेरिकेच्या अर्सेन हेरूटय़ुनेनशी होणार आहे.