वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱयासाठी शिव सुंदर दासची फलंदाज प्रशिक्षकपदी तर दिल्ली संघाचे माजी यष्टीरक्षक अभय शर्माची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बडोदा महिला निवड समितीच्या विद्यमान प्रमुख राजकुवरदेवी गायकवाड यांची भारतीय महिला संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी तृप्ती भटाचार्य या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक होत्या. भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयासाठी 21 सदस्यांचा संघ यापूर्वी निवडण्यात आला आहे. या दौऱयासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू 19 मे रोजी मुंबईत दाखल होणार आहेत.