वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडच्या दौऱयावर गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सोमवारी झालेल्या दुसऱया सामन्यात हार पत्करावी लागली. या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताचा 2-1 असा पराभव केला.
या दौऱयातील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4-0 असा पराभव केला होता. सोमवारच्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडचे खाते मेगान हुलने तिसऱया मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर उघडले. 15 व्या मिनिटाला सलिमा टेटेने पेनल्टीकॉर्नरवर गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना न्यूझीलंडचा दुसरा आणि निर्णायक गोल हुलने पेनल्टी स्ट्रोकवर नोंदविला. आता भारताचा तिसरा सामना बुधवारी होत आहे.