किम उन यांच्याशी संबंध वृद्धिंगत करणार
वृत्तसंस्था / प्योंगयांग
लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत आता डॅगनचा जवळचा मित्र आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्याशी संबंध वृद्धिंगत करू पाहत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर कोरियाच्या 72 व्या स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविला आहे. कोविंद यांनी हे पत्र किम जोंग उन यांना उद्देशून लिहिले आहे. भारताचे राजदूत अतुल एम. गोतसर्वे यांनी हे पत्र उत्तर कोरियाच्या उपविदेशमंत्र्यांना सोपविले आहे.
यापूर्वी भारताच्या राजदूतांनी किम यांना दिलेला शुभेच्छा संदेश चर्चेचा विषय ठरला होता. भारतीय राजदूतांच्या संदेशाला उत्तर कोरियाच्या शासकीय वृत्तपत्रात स्थान देण्यासह टीव्हीवरही त्याचे प्रसारण करण्यात आले होते. जगापासून तुटलेल्या उत्तर कोरियात कुठल्याही विदेशी मुत्सद्याच्या संदेशाला इतके महत्त्व देण्याची ही घटना असाधारण मानावी लागणार आहे.
शासकीय वाहिनी नॅशनल टेलिव्हिजन ऑफ नॉर्थ कोरियावर प्राइम टाइममध्ये भारताचा उल्लेख करण्यात आला तसेच भारतीय राजदूताचा संदेश वाचून दाखविण्यात आला आहे. भारतीय राजदूतांनी किम यांना मार्शल झाल्याला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविला होता. तसेच पुष्पगुच्छही पाठवून किम यांच्या तंदुरुस्तीची प्रार्थना करण्यात आली होती. राजदूतांच्या शुभेच्छा संदेशाला सरकारी वृत्तपत्र रोडोंग सनिमुनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हे वृत्तपत्र उत्तर कोरियाचा अधिकृत दृष्टीकोन दर्शविते. कोरियन उपखंडात शांतता प्रस्थापित व्हावी याकरता भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली