ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रेल्वे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील इजाई नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधणार आहे. या पुलाच्या मोठ्या खांबाची उंची 141 मीटर असणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी 280 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
इजाई नदीवर बांधण्यात येणारा हा पूल जिरीबाम-तुपूल-इंफाळ नवीन बीजी लाईन प्रकल्पाचा भाग असेल. पुलाचे पायरोस हायड्रॉलिक ऑगर्सच्या सहाय्याने तयार केले गेले आहेत. उंच पायऱ्यांना कार्यक्षम व बांधकाम सुनिश्चित करण्यासाठी खासस्लिप-फॉर्म टेक्निक तयार करण्यात आले आहे.
पुलाच्या मोठ्या खांबाची उंची 141 मीटर असेल. तर लांबी 703 मीटर आहे. मार्च 2022 पर्यंत या पूलांचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीजवळ पानवल येथे सर्वात उंच पूल बांधण्यात आला आहे.