ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात विकल्या जाणार्या कोरोना लसींपैकी 60 टक्के लसींचे उत्पादन भारतात होत आहे. त्यामुळे लस निर्मिती क्षेत्रात भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनकडून भारतात विकसित आणि उत्पादित झालेल्या कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न होत आहे.
सिंगापूर आणि टोकियोस्थित सायबर इंटेलिजन्स फर्मच्या माहितीनुसार, चिनी हॅकर्सने नुकत्याच भारतातील दोन लसनिर्मात्यांच्या आयटी सिस्टीम्स हॅक केल्या आहेत. चीन सरकारचे समर्थन असलेल्या ‘एपी 10’ या हॅकिंग गटाने ‘भारत बायोटेक’ आणि ‘सीरम’ इन्स्टिटय़ूटच्या आयटी सिक्युरिटीला सुरुंग लावत आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सप्लाय चेनचा डेटा चोरुन ही सिस्टीम विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आहे.