वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
ब्रम्ह कांचीबोटला या भारतीय वंशाच्या ज्येष्ठ पत्रकाराचे अमेरिकेत कोरोना विषाणूच्या बाधेमुळे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. त्यांचे निधन 6 एप्रिल या दिवशी झाले. मात्र त्याचे वृत्त काहीसे विलंबाने देण्यात आले. त्यांना कोरोनाची लक्षण दिसू लागल्यानंतर लाँग आयलँड येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. ते अनेक वर्षे अमेरिकेतील युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे न्यूयॉर्क आणि संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधी होते. इंडियन पॅनोरामा आणि साऊथ एशिया टाईम्स या भारतीय संस्कृतीला वाहिलेल्या नियतकालीकांमध्येही त्यांनी विपुल लेखन केले होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अनेक भारतीय व अमेरिकन पत्रकारांनीही दुःख व्यक्त केले.