वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस
अर्जेंटिनाच्या दौऱयावर गेलेल्या भारताच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाला सलग दुसऱया सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारत आणि अर्जेंटिना महिला संघामध्ये हॉकी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यातही अर्जेंटिनाने विजय नोंदविला होता.
या दौऱयातील पहिल्या सामन्यात यजमान अर्जेंटिनाने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला होता. त्यानंतर गुरुवारी झालेल्या दुसऱया सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय महिला संघावर 2-0 असा एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात अर्जेंटिनातर्फे सिल्व्हिना डिलियाने दुसऱया मिनिटाला तर ऑगेस्टिना अल्बर्टेरोने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. भारतीय संघाने या सामन्यात अनेक पेनल्टी कॉर्नर्स वाया घालविले. या दौऱयात भारतीय महिला संघाने यापूर्वी अर्जेंटिनाच्या कनि÷ महिला आणि ब संघाबरोबर सामने खेळले आहेत.