ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय वायुसेना आज 88 वा स्थापना दिवस साजरा करतेय. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी कार्यक्रमाला सुरुवात झाली. चीन आणि पाकिस्तान असं दुहेरी आव्हान घेणारी वायुसेना आपल्या कामगिरीचे प्रात्यक्षिक दाखवली. या कार्यक्रमात 56 एअरक्राफ्टनी सहभाग घेतला. यामध्ये राफेल, जॅगुवार, तेजस सहीत सुखोई आणि मिराजचा देखील समावेश आहे.
स्टेटिक डिस्प्लेमध्ये राफेलला मध्यभागी स्थान देण्यात आलंय.फ्लाय पास्टच्या फॉर्मेशनमध्ये देखील राफेलला स्थान देण्यात आले आहे. राफेल लढाऊ विमान हे खास आकर्षण आहे.
विजय फॉर्मेशनमध्ये राफेलसोबत मिराज-2000 आणि जॅगुआर फायटर सारखे जेट्स आहेत. तर ट्रांसफॉर्मर फॉर्मेशनमध्ये तेजस आणि सुखोई विमान देखील असतील. आज आकाशातून साऱ्या जगाला राफेल आणि स्वदेशी तेजसची ताकद बघायला मिळत आहे.
दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायुसेना स्थापना दिनानिमित्त ट्वीट करत अभिमान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.