गुंतवणूकदारांना 10 लाख कोटीचा फटका : रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम
वृत्तसंस्था /मुंबई
मागील काही दिवसांपासून जगभरातील विविध घडामेंडीमध्ये रशिया आणि युक्रेन याच्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये चालू आठवडय़ात हा तणाव खुपच टोकदार होत शुक्रवारी सकाळी मात्र रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन यांनी मात्र आपल्या सैन्याला आदेश दिल्यामुळे याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारात राहिला असून यामध्ये आशियातील शेअर बाजार सर्वाधिक अंकांनी कोसळल्याचे दिसून आले. भारतीय शेअरबाजारातील बीएसई सेन्सेक्स घसरणीसोबत सुरु झाला आणि ट्रेडिंगच्या दरम्यान तो जवळपास 2800 अंकांनी कोसळल्याचे दिसून आले.
दिवसअखेर शुक्रवारी सेन्सेक्स 2702 म्हणजे 4.72 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 54,529.91 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 815.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,247.95 वर बंद झाला. इतक्या मोठय़ा अंकांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जवळपास 10 लाख कोटी रुपयांपेक्षा नुकसान झाले आहे. रशियाच्या शेअर बाजारात 50 टक्क्यांची घसरण आली आहे.
भारतीय बाजारात सलग सातवा दिवस घसरणीसह बंद झाला आहे. सेन्सेक्समधील सर्व 30 समभाग नुकसानीत राहिले होते. बीएसईमधील मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला आहे. सर्व सेक्टोरल निर्देशांक घसरणीसोबत ट्रेड करत होते. निफ्टी रियल्टीमध्ये सर्वाधिक म्हणजे चार टक्क्यांची घसरण आली आहे. निफ्टी पीएसबी, आयटी आणि ऑटो मेटलमध्ये 3.5 टक्क्यांनी घसरण राहिली. तसेच नफ्टी ऊर्जा, पीएसयू बँक वगळता अन्य सर्व क्षेत्र 200 डिएमए स्तरावर पोहोचले.
बीएसईवर 2,578 समभागात घसरण राहिली असून यामध्ये फक्त 270 समभागात तेजी राहिल्याचे दिसून आले. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतर प्रथमच 100 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. बेंटची किमत हि 100.04 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचली असून डब्लूटीआय 95.54 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
काय राहणार आजची स्थिती
शेअर बाजारात युक्रेनवर केलेल्या रशियाच्या हल्ल्यामुळे गुरुवारच्या सत्रात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. यामुळे आजच्या अंतिम सत्रातही बाजारात नकारात्मक स्थिती निर्माण होत गुंतवणूकदारांकरीता ब्लॅक फ्रायडे होण्याची भीती आहे.
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक…… 875
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 795
- बजाज फायनान्स 6626
- ऍक्सिस बँक…….. 730
- टेक महिंद्रा…… 1332
- मारुती सुझुकी.. 8209
- टाटा स्टील…… 1074
- बजाज फिनसर्व्ह 15246
- एचडीएफसी बँक 1419
- विप्रो……………. 536
- अल्ट्राटेक सिमेंट 6420
- एशियन पेन्ट्स. 3067
- स्टेट बँक………… 472
- आयसीआयसीआय 707
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2255
- कोटक महिंद्रा… 1793
- भारती एअरटेल.. 670
- एचसीएल टेक.. 1098
- टीसीएस……… 3402
- एनटीपीसी…….. 124
- हिंदुस्थान युनि. 2171
- एचडीएफसी…. 2341
- इन्फोसिस……. 1677
- पॉवरग्रिड कॉर्प… 190
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1757
- आयटीसी………. 208
- टायटन……….. 2406
- सन फार्मा……… 818
- डॉ रेड्डीज लॅब… 4094
- नेस्ले…………. 17727
- बंधन बँक………. 292
- जेएसडब्लू स्टील. 569
- अंबुजा सिमेंट….. 306
- पिरामल एन्टर. 1948
- अदानी पोर्ट……. 655
- पेट्रोनेट एलएनजी 190
- डिएलएफ……….. 320
- बीपीसीएल…….. 332
- एसीसी………… 2014
- ल्यूपिन…………. 713
- कोल इंडिया…….. 149
- अरोबिंदो फार्मा… 606
- हॅवेल्स इंडिया.. 1146
- एसबीआय लाईफ 1053
- वेदान्ता………….. 337
- कोलगेट……….. 1395
- ब्रिटानिया…….. 3425
- सिप्ला…………… 894
- डाबर इंडिया…… 533