ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला उत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार केला. या गोळीबारात भारताने पाकिस्तानच्या 10 चौक्या उध्वस्त केल्या. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. तर एक नागरिक जखमी झाला आहे.
हरचरण सिंग असे शहीद जवानाचे नाव आहे. या जवानाचा मृतदेह वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकतांसाठी सिव्हिल हॉस्पिटल, राजौरी येथे पाठविण्यात आला आहे. तर जखमी नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पाझी लष्कराने राजौरी व मांजाकोटच्या तारकुंडी भागातही गोळीबार केला.