प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समिती संचलित भारती विद्यालयात समाजसेवक बहिर्जी शिरोळकर यांची पुण्यतिथी झाली. यावेळी शिक्षकांच्यावतीने बहिर्जी शिरोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक टी. एस. लमाणी व शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी आपले विचार मांडले.