मुंबई
विनोदी अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून अटक झाली होती. या पार्श्वभूमीवर आता द कपिल शर्मा शोमधून तिची हकालपट्टी होणार असल्याचे बोलले जात आहे. भारती सिंह हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. तिच्या विनोदाचे अनेक चाहते आहेत. पण ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आल्यानंतर जोरदार टीका झाली होती. एकीकडे कपिल शर्माने भारती सिंहला पाठिंबा दिला तरी द कपिल शर्मा शो प्रसारित होत असलेली वाहिनी सोनी टीव्हीने भारती सिंहला या शोमधून काढून टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.