मुंबई
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराच्या रणनितीनुसार 2021 मध्ये व्यापार 45 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले आहे. 113 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय भारताने 2021 मध्ये केला आहे. मागच्या वषी 78 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय झाला होता. दोन्ही देशातील व्यापार 500 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या उलाढालीचा करण्याचा इरादा उभय देशांनी व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील वस्तूंच्या व्यापाराने नवा विक्रम बनवला आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये व्यापार 45 टक्क्यांनी वाढला आहे. हा एक प्रकारचा ऐतिहासिक विक्रमच मानला जात आहे.