वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
रविवारी येथे झालेल्या हॉकी सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अर्जेंटिना महिला संघाला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून अर्जेंटिना दौऱयाची सांगता केली.
रविवारच्या सामन्यात भारताचे खाते कर्णधार रानीने 35 व्या मिनिटाला उघडले. त्यानंतर इमीला फोरचेरिओने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवून अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. अर्जेंटिनाच्या दौऱयात भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी समाधानकारक झाली. या दौऱयातील भारताचा रविवारचा नियोजित चौथा सामना होता. शनिवारचा भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील तिसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाने या दौऱयात अर्जेंटिनाच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाबरोबरचे दोन सामने बरोबरीत ठेवले तर अर्जेंटिना ब संघाविरूद्धचे दोन सामने गमविले. रविवारच्या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या चार मिनिटात मिळालेले दोन पेनल्टी कॉर्नर्स वाया घालविले.