नवी दिल्ली / प्रतिनिधी
ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेल्या जागतिक ऊर्जा ग्रीडच्या यूके आणि भारताच्या नेतृत्वाखालील ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्हसोबत अमेरिकेने भागीदारी केली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह – ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड’ (GGI-OSOWOG) च्या सुकाणू समितीच्या बैठकीत, यूएस ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी सांगितले की अमेरिका हवामान संवादामध्ये परत येण्यास आणि नवीन उपक्रमात भागीदारी करण्यासाठी उत्सुक आहे . ग्रॅनहोम म्हणाल्या की, “मानव एका वर्षात वापरत असलेली ऊर्जा एका तासात सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचणाऱ्या ऊर्जेइतकी आहे. “GGI-OSOWOG दोन सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहे त्यामुळे यूएस ऊर्जा विभाग GGI-OSOWOG मध्ये भागीदार होण्यात आम्हाला आनंद होत आहे,”
भारताच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) आणि UK च्या COP26 अध्यक्षांनी मंगळवारी COP26 च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेदरम्यान GGI-OSOWOG लाँच केले. GGI-OSOWOG च्या सुकाणू समितीमध्ये भारत आणि यूके – यूएस, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स याशिवाय पाच सदस्यांचा समावेश आहे. हा गट वन सन वन वर्ल्ड वन ग्रीडचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे