ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी स्तरावर उद्या (दि.20) बैठकीची दहावी फेरी होणार आहे. चीनच्या हद्दीतील मोल्डो येथे सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरील सैन्य विस्थापित झाल्यानंतर आता इतर वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य मागे घेण्याविषयी चर्चा केली जाईल. अधिकृत सुत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.