वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली जिमखाना क्लबच्या ग्रासकोर्टवर यजमान भारत आणि डेन्मार्क यांच्यातील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील विश्वगट प्ले ऑफ लढत 4-5 मार्च रोजी होणार आहे.
तब्बल जवळपास 50 वर्षांनंतर भारत आणि डेन्मार्क यांच्यात डेव्हिस चषक स्पर्धेतील लढत होत आहे. यापूर्वी सप्टेंबर 1984 मध्ये उभय संघात डेव्हिस चषक स्पर्धेतील लढत खेळविण्यात आली होती आणि डेन्मार्कने ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकली होती. तत्पूर्वी म्हणजे 1927 साली या दोन संघामध्ये झालेल्या डेव्हिस चषक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत डेन्मार्कने भारताचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. भारताला 3 वर्षांनंतर मायदेशात डेव्हिस लढत खेळण्याची संधी मिळत असून तब्बल पाच वर्षांनंतर दिल्लीमध्ये डेव्हिस चषक सामने खेळविले जात आहेत.
भारतीय डेव्हिस संघामध्ये पी. गुणेश्वरन, युकी भांब्री, रोहन बोपण्णा, रामकुमार रामनाथन, दीविज शरण तसेच राखीव साकेत मिनेनी आणि दिग्विजय प्रताप सिंग यांचा समावेश आहे. डेन्मार्क डेव्हिस संघामध्ये मायकेल टॉर्पेगार्ड, इंग्लिल्डसन, सिग्सगार्ड, ईल्मर मोलेर आणि कर्णधार प्रेडरिक निल्सन यांचा समावेश आहे.