ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताकडून बांग्लादेशला 10 डिझेल रेल्वे इंजिन देणात येणार आहेत. ही इंजिन ‘डब्ल्यूडीएम 3 डी’ प्रकारातील असतील, अशी माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे.
‘डब्ल्यूडीएम 3 डी’ प्रकारच्या या इंजिनात बांग्लादेशच्या गरजेनुसार उंचीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. या इंजिनच्या मोटरची क्षमता 3300 हॉर्स पॉवर आहे. तर या इंजिनांचा वेग ताशी 120 किमी आहे. या इंजिनांचे आयुर्मान 28 वर्षांहून अधिक आहे. तरी देखील देखभालीसाठी भारताने बांग्लादेशसोबत करार केला आहे.
बांग्लादेशला प्रवाशी आणि मालवाहक रेल्वेसाठी ही इंजिन पुरवण्यात आली आहेत. भारताने 1996 मध्येही वाराणसी येथील कारखान्यात तयार केलेली 10 मीटर गेजची डिझेल इंजिन बांग्लादेशला दिली होती.