वृत्तसंस्था/ ब्लोमफौंटेन
भारत अ व दक्षिण आफ्रिका अ या संघांत येथे झालेली तिसरी व शेवटची अनधिकृत कसोटी अनिर्णीत राहिली.
शेवटच्या चौथ्या दिवशी द.आफ्रिका अ संघाने 1 बाद 196 धावांवरून सुरुवात केल्यानंतर त्यात आणखी 115 धावांची भर घातल्यावर 3 बाद 311 धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. तिसऱया दिवशी 86 धावांवर नाबाद राहिलेल्या एर्वीला शतकापासून वंचित रहावे लागले. के. गौतमने त्याला 97 धावांवर बाद केले. झुबेर हामझाने मात्र शतक पूर्ण करीत नाबाद 125 धावा जमविल्या. दुसऱया डावात पृथ्वी शॉने भारताला जलद सुरुवात करून देताना जलद 38 धावा फटकावल्या. पण 17 षटकांत भारताच्या 3 बाद 90 धावा झाल्या असताना दोन्ही संघांनी परस्पर सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.
संक्षिप्त धावफलक ः द.आफ्रिका अ प.डाव 268, दु.डाव 3 बाद 311 डाव घोषित, भारत अ प.डाव 276, दु.डाव 17 षटकांत 3 बाद 90 (शॉ 38, ईश्वरन 19).