वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत माजी विजेते आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना येत्या मंगळवारी 4 फेब्रुवारीला पोर्श्च्स्ट्रॉम येथे खेळविला जाणार आहे. शुक्रवारच्या सामन्यात पाकने अफगाणचा 6 गडय़ांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
शुक्रवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणने 189 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पाकने 41.1 षटकांत 4 बाद 190 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला. अफगाणच्या डावात पाकच्या ताहीर हुसेनने 28 धावात 1, फहाद मुनीरने 29 धावांत 2 आणि मोहम्मद अमीर खानने 58 धावांत 3 गडी बाद केले. पाकच्या कासीम अक्रमने 41 चेंडूत नाबाद 25 आणि मोहम्मद हॅरीसने 43 चेंडूत नाबाद 29 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवू
न दिला.