वृत्तसंस्था/ मनामा
येथे शनिवारी भारत आणि बेलारुस यांच्यात मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे. भारतीय फुटबॉल संघाच्या विदेशी दौऱयातील हा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या दौऱयामध्ये झालेल्या पहिल्या मित्रत्वाच्या सामन्यात बहरीनने भारताचा 1-0 असा निसटता पराभव केला होता.
या दौऱयासाठी गेल्या सोमवारी भारतीय फुटबॉल संघ मुंबईतून बेलारुसला रवाना झाला. दरम्यान, या दौऱयासाठी भारतीय फुटबॉल संघातील सहा फुटबॉलपटूंना व्हिसा समस्येमुळे सहभागी होता आले नसल्याने त्यांना गेल्या बुधवारच्या बहरीन विरुद्धच्या सामन्यात सहभागी होता आले नाही. बहरीनविरुद्धच्या सामन्यात अनिरुद्ध थापा आणि अनिकेत जाधव यांना खेळण्याची संधी लाभली होती. शनिवारी बेलारुसविरुद्धच्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघ आपल्या कामगिरीत निश्चित सुधारणा करेल, असा विश्वास संघाचे प्रशिक्षक स्टीमॅक यांनी व्यक्त केला. 2022 च्या फुटबॉल हंगामात भारतीय फुटबॉल संघाचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचा सामना आहे. गेल्या वषीच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाने वेल्स, झेक प्रजासत्ताक आणि जॉर्डन विरुद्ध सामने खेळले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने जॉर्डनवर 1-0 असा निसटता विजय मिळविला होता. दरम्यान, रशिया आणि युपेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने पूर्व युरोपियन देशाबरोबर सामने खेळण्याचे टाळले. युपेन-रशिया यांच्यात अद्याप युद्ध सुरू असून भारताने रशियाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. पण फिफाने रशियावर निर्बंध घालण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शनिवारचा हा मित्रत्वाचा फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल.