प्रतिनिधी/ बेळगाव
भारत विकास परिषदेतर्फे आझादी का अमृत महोत्सवांतर्गत देश भक्तीपर समुह गायनाचा कार्यक्रम स्काय ऍव्हेन्युव गॅलेक्सी म्युझीक क्लबच्या विद्यमाने पार पडला. परिषदेचे अध्यक्ष सुहास सांगलीकरण यांनी स्वागत केले. एन. रघुराम यांनी प्रास्ताविक केले.
यानंतर परिषदेच्या सदस्यांनी मराठी, हिंदी व कानडी देशभक्तीपर गीते सादर केली. त्यांना विनायक मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. प्रा. अरुणा नाईक यांनी आभार मानले.