डम्बुला / वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघ आज श्रीलंकन महिला संघाविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी मालिकाविजयाचे लक्ष्य त्यांच्या नजरेसमोर असणार आहे. या मालिकेत गुरुवारी संपन्न झालेल्या पहिल्या लढतीत भारतीय संघाने 34 धावांनी बाजी मारत विजयी सलामी दिली. तोच धडाका येथेही कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवली जाईल.
भारतीय संघाला ही मालिका जिंकण्याबरोबरच बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करण्याची येथे उत्तम संधी असेल. यंदा 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेट प्रकाराचे पदार्पण होणार आहे.