ऑनलाईन टीम / मुंबई :
देशाच्या संरक्षण विभागाला आणखी मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून 70 हजार असॉल्ट रायफल खरेदी करणार आहे. रशियासोबत झालेल्या आपत्कालीन खरेदी कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यातील रक्कम प्राप्त झाल्यानंतर रशियाकडून येत्या तीन महिन्यांत या रायफल भारताकडे सुपुर्द केल्या जातील.
भारत आणि रशियातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाकडून खरेदी करण्यात येणाऱया असॉल्ट रायफल प्रामुख्याने हवाई दलासाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच हवाई दलासाठी रशियाकडून केए 226 टी हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचाही संरक्षण विभागाचा विचार आहे.