झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या लोकप्रिय वाहिन्या सादर करणारा झी समूह लवकरच प्रत्येक क्षण उन्नत करत मराठी प्रेक्षकांसाठी झी वाजवा ही नवी वा]िहनी घेऊन आला आहे.
झी वाजवा, क्षण गाजवा, या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्यासाठी प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश्य आहे, कारण क्षण झिंगाट तर लाईफ झिंगाट! हि वाहिनी प्रेक्षकांना डॉल्बी आवाजात 3000 पेक्षा जास्त गाणी आणि प्रेक्षकांना पेंद्रासाठी ठेवून केलेले अनोखे कार्यक्रम सादर करणार आहे. गाण्यांसोबतच ही वाहिनी आठवडय़ाचा शेवटी एक अनोखा विनोदी कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे भावडय़ाची चावडी. चावडीच्या माहोलला मराठी तरुणाई रिलेट करू शकते कारण त्यांच्या खऱया आयुष्यात देखील ते आपल्या मित्र मैत्रिणींना जवळच्या कट्टय़ावर भेटून वेळ घालवतात, हाच माहोल झी वाजवा टेलिव्हिजनवर या कार्यक्रमातून सादर करणार आहे. या कार्यक्रमाची कथा भावडय़ा या कुठल्याही सामान्य मुला सारख्या असलेल्या मुलाभोवती फिरते. हा एक तरुण मुलगा आहे ज्याला असं वाटत कि त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे पण त्याला नक्की आयुष्यात पुढे काय करायचंय हे त्याला अजून कळलं नाही आहे. याच गोष्टीवर चर्चा करत भावडय़ा आणि त्याचे अजून 2 मित्र त्याच्यासोबत चावडीवर वेळ घालवतात आणि त्यांच्या या चर्चेत ते अनेक कलाकारांना देखील आमंत्रित करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेतात. या कार्यक्रमातील भावडय़ा हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ भालेराव आहे. या कार्यक्रमातून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, सिद्धार्थ जाधव, अमफता खानविलकर आणि इतर अनेक कलाकार सिलेब्रिटी गेस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.
आपल्या टेलिव्हिजन पदार्पणाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना पार्थ भालेराव म्हणाला, मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी वाजवा या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा हजर होतोय आणि यावेळी टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यासाठी मी खूप उत्सुक आहे. भावडय़ाची चावडी या कार्यक्रमात मी अगदी वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दुप्पट मजा, भरपूर मनोरंजन आणि आम्ही कलाकारांसोबत केलेला वेडेपणा या कार्यक्रमातून प्रेक्षक अनुभवू शकतील. या कार्यक्रमाच्या थीमसोबत सर्व प्रेक्षक रिलेट करू शकतील आणि म्हणूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना टीव्ही क्रीनला खिळवून ठेवेल अशी मला खात्री आहे.