साताऱ्याचा मृत्यूदर कमी होईना
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हय़ात गेल्या आठवडय़ापासून बाधित वाढण्याचा वेग मंदावू लागल्याने दिलासा मिळू लागलाय. 200, 300, 400 च्या पटीत होणारी वाढ देखील कमी व्हावी अशीच सर्वांची भावना आहे. मात्र, वेग मंदावतोय पण जिल्हय़ात कमी संख्येने पण बाधित वाढत असल्याने कमी, जास्त धक्क्यांच्या भावनांच्या हिंदोळय़ावर जिल्हावासिय झुलत आहेत. सध्या बेडसाठीची पळापळी कमी झाली आहे. मात्र बाधितांचा मृत्यूदर घटत नसल्याने चिंताही आहे. बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 438 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 27 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा, कराडसह फलटणमध्ये वाढ सुरुच
सातारा हॉटस्पॉट ठरलेला असताना कराडात वेग मंदावू लागला असला तरी कमी संख्येने बाधित वाढतच आहेत. फलटण, माण, वाई, कोरेगावात वाढत असलेले बाधित त्या त्या ठिकाणी चिंता निर्माण करत आहेत. एकीकडे वेग मंदावल्याचा दिलासा मिळत असताना मृत्यूदराची वाढती चिंता अशा हिंदोळय़ावर सध्या कोरोना संसर्गाची स्थिती झुलत असून लोकांमधील भयगंड दूर झाला असला तरी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला उपाय योजना वाढवण्याची गरज आहे.
मंगळवारी रात्री कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुका 67 बाधित
सातारा 16, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1, सदरबझार 5, करंजे 3, गोडोली 3, शाहुपुरी 2, कोडोली 1, गोळीबार मैदान 1, सदाशिव पेठ 1, संगमनगर 1, बोरगाव 1, सासुर्वे 1, म्हसवे रोड 1, पाटखळ 2, अतित 1, चिंचणेर 1, शेळकेवाडी 2, धनगरवाडी 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, कारी 1, दौलतनगर सातारा 1, भैरवनाथनगर सातारा 1, विकासनगर सातारा 1, राऊतवाडी 1, सैदापूर सातारा 1, दौलतनगर सातारा 1, परळी लवंघर 1, शाहुनगर 1, शिवाजीनगर सातारा 3, कळंबे 1, बसाप्पाचीवाडी 2.
कराड तालुका 82 बाधित
कराड 12, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 2, आगाशिवनगर 4, विद्यानगर 3, सैदापूर 4, मुजावर कॉलनी कराड 2, मलकापूर 4, गोळेश्वर रोड 1, इंदोली 1, काले 2, आटके 4, रेठरे बु 2, येणके 4, पार्ले 4, कोपर्डे हवेली 2, सुपने 2, नांदगाव 1, वाठार 2, दुशेरे 2, तांबवे 1, येरावळे 1, कार्वेनाका 1, टेंभु 1, ओंड 1, राजमाची 4, नारायणवाडी 2, उंब्रज 1, विंग 1, घोणशी 2, कालवडे 2, मसूर 2, गोंदी 1, सालपे 1, येळगाव 1.
फलटण तालुका 66 बाधित
फलटण 2, फडतरवाडी 1, धुमाळवाडी 1, भाडळी खुर्द 1, कुरवली 1, झिरपवाडी 6, आदर्की बु 4, गोखळी 3, गिरवी 1, स्वामी विवेकानंदनगर 1, सांगवी 1, निरगुडी 1, रविवार पेठ फलटण 2, लक्ष्मीनगर 5, जाधववाडी 2, सगुनामातानगर 1, कोळकी 3, संजीवराजेनगर 1, शिवाजीनगर 1, धुळदेव 1, गिरवी नाका फलटण 1, पोलीस कॉलनी 1, शुक्रवार पेठ 1, हिंगणगाव 1, भाडळी 1, गुणवरे 2, खटकेवस्ती 1, विडणी 3, बिरदेवनगर 3, हाडको कॉलनी 1, तरडगाव 12.
माण तालुका 46 बाधित
पुळकोटी 1, बोथे 1, म्हसवड 21, विरळी 2, गोंदवले बु 2, राणंद 1, पळशी 1, शेवरी 1, दहिवडी 4, शिंगणापुर 1, पांगारी 1, कुळकजाई 2, मलवडी, ऊकिरडे 2, राणंद 1, मार्डी 1, लोधवडे 3.
कोरेगाव तालुका 46 बाधित
कोरेगाव 10, करंजखोप 1, बिचुकले 1, वाठार किरोली 1, पिंपरी 7, फडतरवाडी 4, देवूर 1, भाडळे 1, सांगवी 5, दहिगाव 1, रहिमतपूर 3, वेलंग 1, किन्हई 3, अंभेरी 2, दुघी 3, एकसळ 1, शिरढोण 1.
वाई तालुका 38 बाधित
रविवार पेठ 2, गणपतीआळी 1, सह्याद्रीनगर 3, धर्मपुरी पेठ 1, विराटनगर 1, वेळे 3, सुरुर 2, चांदक 1, लगडवाडी 1, यशवंतनगर 4, बलकवडी 1, मेणवली 1, चिखली 5, व्याहळी कॉलनी 3, केंजळ 1, कदमवाडी 1, कवठे 1, भुईंज 1, फुलेनगर 1, गंगापुरी 2, रामडोळ आळी 1, बावधन 1.
खटाव तालुका 30 बाधित
वडूज 9, खटाव 2, बुध 1, गणेशवाडी 1, कलेढोण 1, बोंबाळे 1, पुसेगाव 7, वर्धनगड 1, विसापूर 1, औंध 2, मायणी 1, तुपेवाडी 1, वाकेश्वर 1, सिद्धेश्वर कुरोली 1.
खंडाळा तालुका 12 बाधित
निंबोडी 1, खंडाळा 1, लोणंद 2, अंबरवाडी 4, सुखेड 1, शिरवळ 2, पाडळी 1.
पाटण तालुका 8 बाधित
पाटण 3, बाचोली 1, खाले 1, कोयनानगर 2, मारुल हवेली 1.
महाबळेश्वर तालुका 2 बाधित
पाचगणी 1, टेकवली 1,
जावली तालुका 8 बाधित
कुडाळ 1, सरताळे 2, ओझरे 2, मोरावळे 2, बामणोली 1.
इतर 1, माजगाव 1, वडगाव 1, सह्याद्रीनगर 1, कवठे 1,कालेवाडी 1, सोनेवाडी 1, खुबव 1, गोडसेवाडी 4. बाहेरील जिह्यातील कासेगाव 1, ढगेवाडी ता. वाळवा 1, वाळवा 4, नेरले ता. वाळवा 2.
सातारा जिल्हय़ात 27 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सोनगाव ता. सातारा 85 वर्षीय पुरुष, वेळेकामथी ता. सातारा 49 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव 65 वर्षीय पुरुष, शिरवळ ता. खंडाळा 82 वर्षीय पुरुष, सातारा 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ ता. सातारा 54 वर्षीय पुरुष, न्यु एम.आय.डी.सी.सी. ता. सातारा 82 वर्षीय पुरुष, एकसळ, ता. कोरेगाव 7 दिवसीय बालक, मल्हार पेठ ता. सातारा 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ ता. सातारा 75 वर्षीय महिला, आदर्की खुर्द ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा 70 वर्षीय महिला. तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शिवथर ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, गायत्री कॉलनी शाहुपुरी ता. सातारा 83 वर्षीय महिला, हणमंतनगर ता. फलटण 65 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड 57 वर्षीय पुरुष, कराड 75 वर्षीय पुरुष, शिवडे ता. कराड येथील 73 वर्षीय महिला. उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे विठ्ठलनगर खेड ता. सातारा 85 वर्षीय महिला, चोरे ता. कराड 60 वर्षीय महिला, येळगाव ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष, बेलवडे ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, हवेली ता. कराड येथील 62 वर्षीय महिला, कानेगाव ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, हेळगाव ता. कराड 65 वर्षीय पुरुष, वडोली निळेश्वर ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर ता. कराड 55 वर्षीय महिला अशा एकूण 27 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
बुधवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,54,540
एकूण बाधित 40,195
एकूण कोरोनामुक्त 31229
मृत्यू 1300
उपचारार्थ रुग्ण 7,666