प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीतही बेळगावच्या शिवपेमींनी आपल्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात साजरी होणारी शिवजयंती यंदा कोरोनामुळे साधेपणाने साजरी करावी लागली तरी शिवप्रेमींचा उत्साह दांडगा होता. अनेक उपक्रमांद्वारे जयंती साजरी करण्यात आला. समृद्धी कॉलनी ओमकारनगर वडगाव येथील प्रांजली चौगुले यांनी घराच्या भिंतीवर शिवरायांचे चित्र रेखाटून आगळय़ा पद्धतीने जयंती उत्सव साजरा केला. तसेच शिवरायांच्या चित्राचे पूजन करून राजांना मानवंदना दिली.