भिलवडी पोलिसांची घटनास्थळी तात्काळ धाव…
भिलवडी / प्रतिनिधी
भिलवडी माळवाडी येथे आज १३/१०/२०२१ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत माळवाडी निशिदी कॉर्नर वरती असणाऱ्या आनंदा बाळू माळी रा. माळवाडी यांच्या मालकीचे भाड्याने दिलेल्या पत्राचे ६ दुकान गाळेयांना आग लागल्याने भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व तसेच चितळे फायर ब्रिगेड, हिंदुस्तान पेट्रोलियम हजारवाडी फायर ब्रिगेड, तासगांव नगरपरिषद फायर ब्रिगेड यांना फोन करून कळवले व तात्काळ घटनास्थळी फायर ब्रिगेड गाड्यांना प्रचारण केले व भीषण आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
घटनास्थळी कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. सदर भाड्याने दिलेले गाळे अभिजीत रामचंद्र खामकर रा. खंडोबाचीवाडी ता. पलूस यांचे शेती साहित्य असलेल्या दुकानात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. व आगीमुळे बाजूस असलेल्या शेजारील दोन दुकान गाळ्यांमध्ये आग लागून दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने आकाशामध्ये धुराचे नोटच लोट दिसून येत होते व भिलवडी आणि माळवाडी येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. दुकान गाळेमालक यांच्याकडून नुकसानीची माहिती पोलीस प्रशासन घेत आहोत. पुढील कार्यवाही भिलवडी पोलीस ठाणे करीत आहे.