ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील भिवंडीमध्ये गोदाम कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 7 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील हरिहर कंपाऊंड इथं गोदाम असलेली एक मजली इमारत आज कोसळली. ही घटना सोमवारी सकाळी 10.25 च्या सुमारास घडली. या इमारतीमध्ये 7 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहेे.
दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाला (टीडीआरएफ) मदत आणि बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. तसेच घटनेचे गांभीर्य पाहून एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आलेय. या दुर्देवी घटनेत अद्याप कोणाची मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.