प्रतिनिधी /वाळपई
वाळपई– होंडा दरम्यानच्या भुईपाल याठिकाणी आज सकाळी स्कूटर व कार यांच्यादरम्यान झालेल्या अपघातात भुईपाल येथील लक्ष्मण शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकीच्या धडकेने जीपगाडीचा टायर फुटण्याचा प्रकार घडल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली.
याबाबतची माहिती अशी की आज दुपारी लक्ष्मण शिंदे हा वाळपई शहरातून होंडा भागाकडे येत होता तर पेटा ही जीप गाडी होंडा भागातून वाळपई शहराकडे जात होती.भुईपाल या ठिकाणी लक्ष्मण शिंदे चालवीत असलेली स्कूटर याची जोरदार धडक बसली. यामुळे तो जागीच कोसळला. या अपघातात दरम्यान त्याच्या डोक्मयाला जबर मार बसला असून त्याला उपचारार्थ वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अजूनही धोकादायक स्वरूपाची असल्याची माहिती वैद्यकीय सुत्राकडून प्राप्त झाली आहे.
दरम्यान सदर अपघात एवढा जबरदस्त होता की या अपघातातील पेटा जीप गाडीचा पुढचे चाक फुटण्याची घटना घडली . दरम्यान पोलिसांनी या संदर्भाचा पंचनामा केला असून पुढील तपासाची प्रक्रिया निरीक्षक हरीश गावस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पोलीस यंत्रणेने स्पष्ट केले.