प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव मोटारसायकलची रस्त्याशेजारी थांबलेल्या टेम्पोला धडक बसून बिरनहोळी, ता. हुक्केरी येथील एक युवक जागीच ठार झाला. गुरुवारी रात्री पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टीजवळ हा अपघात घडला.
यल्लाप्पा सत्याप्पा बुडकी (वय 38) रा. बिरनहोळी असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. केए 25, ईएम 0172 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून यल्लाप्पा बिरनहोळीहून बेळगावकडे जात होता. टायर फुटून मुक्तीमठाजवळ रस्त्याशेजारी एक गुड्स टेम्पो उभी होती. मोटारसायकलची टेम्पोला पाठीमागून धडक बसली.
या अपघातात यल्लाप्पाचा मृत्यू झाला. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत. यल्लाप्पाचे वडील सत्याप्पा बुडकी यांनी फिर्याद दिली असून काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.