अभिषेक पारवाटीका वर्षभराचा खर्च सांभाळणार
प्रतिनिधी /बेळगाव
वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, याकरिता भुतरामहट्टी येथील वन्यप्राण्यांसाठी दत्तक योजना राबविली गेली आहे. याला प्रतिसाद देत अभिषेक पारवाटीका यांनी येथील कासवाला एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे. कासवाचा वर्षभराचा खर्च ते पाहणार आहेत.
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात वाघ, सिंह, बिबटे, अस्वल, हरीण, चितळ, सांबर, मगर आदी प्राणी दाखल झाले आहेत. वन्यप्राण्यांचा खर्च अधिक प्रमाणात असल्याने प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने दत्तक योजना राबविली आहे. याला समाजातील वन्यप्राणी प्रेमीतून प्रतिसाद मिळत आहे. गतवषी वाघ, सिंह आणि बिबटय़ांनादेखील दत्तक घेण्यात आले होते. आता अभिषेक पारवाटीका यांनी कासवाला दत्तक घेतले आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱयांकडून त्यांना देण्यात आले आहे.