प्रतिनिधी/गारगोटी
भुदरगड तालुक्यात कोरोना महामारीचा धोका अधिकच वाढतच चालला असून वेंगरूळ येथे क्वारंटाईन केलेल्या चार नागरिकांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात बशाचा मोळा, कोंडीशी पैकी सुतारवाडी येथील दोन रूग्ण आणि पुन्हा वेंगरूळ येथे नव्याने चार रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण भुदरगड तालुका हादरून गेला आहे.
मुंबई येथून आलेल्या नागरिकांना वेंगरुळ येथील प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन केले होते. आज त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. प्रांताधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून गाव सीलबंद करून वेंगरूळ गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.