प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील बशाचामोळा व कोंडोशी पैकी सुतारवाडी येथील प्राथमिक शाळामध्ये क्वॉरंटाइन केलेले दोघेजण कोरोणाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पश्चिम भुदरगड परिसरात खळबळ माजली आहे. आतापर्यंत मडिलगे येथील दोघांसह कोरोनाग्रस्तांची संख्या चार झाली आहे.
बशाचामोळा येथील 22 वर्षीय युवक मुंबई परेल येथून 14 मे रोजी कोल्हापुरात आला होता. कोल्हापुरातील शासकीय रूग्णालयात त्याचे स्वॅब घेण्यात आला होता. त्यास गावातील प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन केले होते. सर्दी व खोकला जाणवत असल्याने आरोग्य विभागाला माहिती दिली होती. आरोग्य विभागाने त्याची तपासणी केली होती. सोमवारी उशीरा त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. आज सकाळी त्यास कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुतारवाडी येथील 28 वर्षीय व्यक्ती बशाचामोळा येथील युवकाबरोबर त्याच्या गाडीतून आली होती. सुतारवाडी येथील व्यक्तीचा 14 मे रोजी घशाचा स्त्राव घेतला होता. सोमवारी उशीरा त्याचा अवहाल पॉझीटीव्ह आला. यालाही उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवीण्यात आले आहे. यांच्याबरोबर शेजारील गावातील एक युवक आला होता. पश्चिम भुदरगड परिसरात हे दोन नवे रूग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.