नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
विविध दुखापतीने त्रस्त असलेल्या मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर लंडनमध्ये स्पोर्टस हर्नियावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर मायदेशी परतल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याची पूनर्वसन प्रक्रिया सुरु होईल. भुवनेश्वर केव्हा पूर्ण तंदुरुस्त होईल, याबाबत अद्याप काहीही चित्र स्पष्ट नाही. मात्र, आयपीएल स्पर्धेपूर्वी तो उपलब्ध असेल, असे मानले जाते. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 29 मार्चपासून खेळवली जाणार असून यात भुवनेश्वर सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्व करत आला आहे. भुवनेश्वर दि. 9 रोजी लंडनला रवाना झाला आणि दि. 11 रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. 29 वर्षीय भुवनेश्वरने भारतीय संघातर्फे आजवर 21 कसोटी, 114 वनडे व 43 टी-20 सामने खेळले आहेत.