हजारवर, मदतीचा ओघ सुरू
पोर्ट ओ प्रिन्स
गेल्या काही दिवसांपूर्वी कॅरेबियन देश हैतीला जबदरस्त भूकंपाचा तडाखा बसला आणि त्यात अनेक इमारती कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान 7.2 रिश्टर स्केलच्या या जबरदस्त भूकंपातील मृतांची संख्या आता 2 हजारवर पोहचली असल्याचे समजते. दरम्यान हैतीला अमेरिकेसह इतर देशांनी मदत पोहचवायला सुरूवात केली असल्याचे सांगण्यात येते. एका न्यूज एजन्सीने मात्र हैतीत 10 हजारहून अधिक जणांचा मृत्यु झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे. या भूकंपात 2 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावला असून हजारो जखमी झाले आहेत. अमेरिकेने आपले मदतीकरीताचे विमान हैतीत दाखल केले आहे. यादरम्यान फ्रान्स सरकारनेदेखील आपले जहाज व हेलिकॉप्टर 25 जवानांसह हैतीला पाठवले आहे. भूकंपात 53 हजाराहून अधिक घरे संपूर्णपणे कोसळली असून 12 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. यापूर्वी 2010 मध्येही या देशाला भूकंपाने धक्का दिला होता, ज्यात मोठी जीवितहानी झाली होती.