गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातच्या कच्छ भागात शनिवारी 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू धोलावीराजवळ होता. मध्यम तीव्रतेच्या या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा इतर कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
गांधीनगर येथे असणाऱ्या आयएसआर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनी 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे घाबरून बरेच लोक मोकळ्या मैदानात जमा झाल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. यापूर्वी 4 ऑगस्टला याच जिल्ह्यात 4.0 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू रापरजवळ होता. कच्छ जिल्हा हा अत्यंत धोक्याच्या असणाऱ्या भूकंपीय क्षेत्रात आहे. इथे 2001 मध्ये अत्यंत विनाशकारी भूकंप झाला होता