झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागांमधील एक लहानसा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो असं दिसतंय. विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तसंच त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हंटल आहे कि, ‘प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच’. तुम्ही सर्वांनी आदीत्यच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. त्याचवेळी गौतमी देशपांडे हीने देखील एक असा फोटो शेअर केला आहे. ज्याने या गोंधळात अजूनच भर पडली आहे. हातात पिस्तूल घेऊन गोळी झाडणाऱया सईचा हा फोटो असून या दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध आहे? खरंच आदित्यचा मृत्यू होणार आहे का? सईच आदित्यवर हल्ला करणार? की कोणा दुसऱयाने केलेल्या हल्याला परतवून लावण्यासाठी सईने हातात शस्त्र घेतलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. मालिकेच्या पुढच्या काही भागात या साऱया प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
Previous Articleअक्कलकोटमध्ये विवाहितेचा पतीनेच केला गळा दाबून खून
Next Article जिह्यातील 20 हजार लाभार्थ्यांना घरकुले मंजूर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.