अथणी येथे लाच घेताना अडकली होती लोकायुक्तांच्या जाळय़ात
प्रतिनिधी /बेळगाव
अथणी भूमापन कार्यालयातील अधिकारी महिलेला येथील चतुर्थ अतिरिक्त व विशेष न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सात वर्षांपूर्वी शेतकऱयाकडून लाच घेताना लोकायुक्तांनी तिला रंगेहाथ पकडले होते.
विशेष न्यायाधीश विजय व्ही. यांनी अथणी येथील भूमापन अधिकारी शाहीनबेगम अहम्मदअली कुरी यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 28 डिसेंबर 2015 रोजी 1500 रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले होते.
दोडवाड (ता. अथणी) येथील निंगाप्पा चन्नाप्पा पाटील यांची सत्ती येथे 20 गुंठे जमीन आहे. जमिनीची हद्द ठरविण्यासंबंधी त्यांनी अटलजी नेम्मदी केंद्रात अर्ज केला होता. या अर्जाची विल्हेवाट करण्यासाठी शाहीनबेगम यांनी 1500 रुपयांची लाच मागितली होती. लाच घेताना 28 डिसेंबर 2015 रोजी लोकायुक्त अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले होते. तत्कालीन लोकायुक्त उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले. लोकायुक्त पोलीस प्रमुख यशोदा वंटगोडी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला.