आमदारांची आर्थिक मदत
प्रतिनिधी /बेळगाव
भेंडिगेरी ता. बेळगाव येथील राजू मरशेट्टी यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्तांना 1 लाखाची आर्थिक मदत केली.
आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. घरातील वस्तु, भांडी, धान्य, जीवनोपयोगी साहित्य, कागदपत्रे पूर्णपणे जळाल्या आहेत. केवळ सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः एक लाखाची मदत केली असून सरकारकडून मिळणाऱया सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.