भीती न बाळगता लस घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भेंडीगेरी व गजपती या गावात कोरोना निर्बंधक लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत हर्ष शुगर्सचे व्यवस्थापक संचालक चन्नराज हट्टीहोळी यांनी या मोहिमेला चालना दिली.
18 वर्षांवरील युवकांसह नागरिकांना पहिला डोस दिला जात आहे. तसेच दुसरा डोस वेळेत देण्याची सूचनाही आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱयांना केली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लस एकमात्र उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन चन्नराज यांनी केले.
यावेळी लोकप्रतिनिधी, गावकरी, आशा कार्यकर्त्या व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.